मी जन्माला आलो
मी रांगायला लागलो
मी बोलायला शिकलो
मी चालायला लागलो
मी... वगैरे, वगैरे, वगैरे
मी शाळेत गेलो
मी वाचायला शिकलो
मी लिहायला शिकलो
मी परिक्षा लिहिलो
मी इयत्ता ओलांडलो
मी... वगैरे, वगैरे, वगैरे
मी प्रेमात ! पडलो
मी तिच्यासाठी रडलो
मी ओठांवरची लव कुरवाळलो
मी कॉलेजात गेलो
मी पिक्चर बघितलो
मी... वगैरे, वगैरे, वगैरे
मी डोळे उघडले
मी अर्थ वाचले
मी प्रश्न लिहिले
मी शब्द गिळले
मी... वगैरे, वगैरे, वगैरे
मी अजून जगतोय
मी अजून शिकतोय
मी अजून शोधतोय
मी अजून कळतोय
मी... वगैरे, वगैरे, वगैरे
मी आत्मकेंद्री
मी आत्ममग्न
मी एककल्ली
मी स्वार्थी
मी जगन्मित्र
मी संवेदनशील
मी शिखंडी
मी खेळकर
मी अलवार
मी... वगैरे, वगैरे, वगैरे
मी एके
मी दुणे
मी त्रिक
मी चोक
मी... वगैरे, वगैरे, वगैरे
मी एक शून्य...
मी सहज मिसळतो
सभोवतालास न बदलता
मी अवचित निसटतो
कोणासही न कळता
मी इच्छा बाळगतो
कुणासही न गुणण्याची
मी कुणासच भागनेच तसेच अर्थहीनच आहेच
मी प्रयत्न करतोय
मला अर्थ देणारा
डाविकडचा अंक मिळवण्याचा
मी ऊजेडाला सोडल्यावर
माझे काळोखाशीही वाजल्यावर
मीच मला कंटाळून विचारले...
का? कधी? कशासाठी? कोणासाठी?
त्यावर सापडलेले ऊत्तर असे...
कारण..."मी एक माणूस आहे
एका मार्काचा वस्तुनिष्ठ प्रश्न नाही"
No comments:
Post a Comment