काय माहित कोण हा
इतका लळा लावूनी जातो,
समजू न शकले कोणीच
म्हणून एकांताशी मैत्री करतो..
प्रेम म्हणजे स्वर्ग मानतो
दुखः मात्र एकटाच सहतो,
प्रेमात फक्त प्रेम द्यायचे
बस् ! तो इतकेच जाणतो..
एकतर्फी प्रेमात तिच्या
क्षणो क्षणी जळत राहतो,
गुंज मनाचे अबोल प्रेम
तो कवितांमधुनी रेखाटतो..
विसरण्याचा प्रयत्नही करतो
अश्रू मात्र डोळ्यांतच गिळतो,
नाही वर्तमान, नाही भविष्य
तो फक्त भूतकाळात जगतो..
- हरिष मांडवकर
No comments:
Post a Comment