Powered By Blogger

Friday, May 15, 2009

पाऊस असा रुणझूणता

पाऊस असा रुणझूणता

पैंजणे सखीची स्मरली

पाऊस भिजत जाताना

चाहूल विरत गेलेली ...

ओले त्याने दरवळले

अस्वस्थ फुलांचे घोस

ओलांडून आला गंध ,

निस्तब्ध मनाची वेस

पाऊस असा रुणझूणता

[ पाउस सोहला झाला ,

पाउस सोहला झाला कोसळत्या आठवणीचा

कधी उधाणता अन केव्हा

संथ थेम्बंच्या संथ लयीचा ]..

नभ नको नको म्हणताना पाउस कशाने आला

गात्रातून स्वच्छंदी अन अंतरात घुसमटलेला..

पाऊस असा रुणझूणता पैंजणे सखीची स्मरली

पाऊस भिजत जाताना चाहूल विरत गेलेली..

No comments:

Total Pageviews