आठवण कुणाची येते ना...
तेव्हा मन वेडं होत...
पापणीच्या आडून मग...
अलगद ते ओघळू लागतं
तुला ही आठवण येईलच ना...
तेव्हा डोळे येतील भरून,
थरथरणार्या ओठांवर...
शब्द ही जातील विरून
मोत्यासार्ख्या अश्रुंना
ओंजळीत घ्यावं लागत
बघ ना...बोलत बोलता॥
मन होइल तुझं हलकं...
मी ही मग स्वतःला
मुक्यानेच करेन बोलकं...
मग मलाच म्हणशील तू.... " वेडू..."
....तेवढं बरं तुला कळतं
वेडे, .....तुझीच आठवण येते.......
मन, अलगद ओघळू लागतं
कूणीतरी लागते आपल्याला वेडू
म्हणणारेआणि वेडू म्हणतांना
आपल्यातील शहाणपण जपणारे
No comments:
Post a Comment