Powered By Blogger

Tuesday, May 26, 2009

मी.........


खंरतर स्वताबद्दल काय लिहायचे असा प्रश्न सर्वानांच पडतो कदाचित! 
कारण मला तो पडला होता. 
Internet च्या अभासी दुनियेत म्हणजे येथे मि काहीही लिहले ते खरे का खोटे हे त्या समोरच्या व्यक्तीच्या विश्वासावरचं अवलंबुन असेल...........
समोर बसलेली व्यक्ती खरी का खोटी हे जस तुम्हाला त्याच्याशी मैत्री केल्याशिवाय समझणार नाही. 
तसं ते मलाही सांगता येणार नाही.

प्रत्येकाचे स्वभाव, आवडी-निवडी, जरी वेगळे असले तरी मैत्री होण्याचे बरेच Chance आहेत. 
एकाद्याचे मन जिंकल्याशिवाय जशी निखळ मैत्री होत नाही तशी तेच मन दुखवल्यावर ति मैत्री टिकतही नाही.

तरीही मला तुमच्याशी मॆत्रि करण्यात Intrest आहे. 
कारण आयुष्याचा प्रवास तुम्हा-आम्हाला एकदाच करायचा आहे..........
एकचं संधी आयुष्य जगण्याची, मित्र होण्याची..........
आयुष्याच्या प्रवासात मैत्रीच्या ट्रेनमध्ये प्रवास करण्याची.............. 
करालं ना मग मैत्री?...


"असाच आहे मी
चांदण्यांबरोबर रात्री गप्पा मारणारा
वाऱ्याबरोबर दुर
फिरायला जाणारा
हिरव्या सावलीत
कोठेतरी रमलेला
असाच आहे मी
कवितेतल्या चारओळीत
कोठेतरी हरवलेला"


मी आहे हा असा आहे,पटले तर बघा नाहीतर सोडून द्या.

धन्यवाद!!!!!!!!!!!!!!!


माज़्या सारखा एखादाच असतो
नशीबवान तर सगळेच असतात
नशीबाला बदलणारा एखादाच असतो
हसतमुख तर सगळेच असतात
दुसर्याला हसवणारा एखादाच असतो
मर्त्य तर सगळेच असतात
कर्तुत्ववान अमर एखादाच असतो
चमकणारे काजवे बरेच असतात
प्रखरतेने उजळणारा एखादाच असतो
सुखाचे सोबती सर्वच असतात
दुःखाचा साथीदार एखादाच असतो
अनुभवाने शहाणे बरेच असतात
अनुभवालाही शाहाणा करणारा एखादाच असतो
जाळणारे बरेच असतात
मेणबत्तीप्रमाणे जळणारा एखादाच असतो
प्रेम करणारे बरेच असतात
पणं माज़्या सारखा प्रेम करणारा एखादाच असतो.............




आयुष्याला "fullstop"लागायच्या आधी......
काहीतरी करून दाखवायचय,
लाखोंच्या गर्दीत स्वतःसाठी
"red carpet"बनवायचय !!
आरशासमोर उभं राहून
नजर वर करून 'त्याला' बघायचय,
ताठ मानेनेच 'त्या' समोरच्याला विचारायचय,
तू फ़क्त बोल,अजून कोणतं क्षितिज गाठायचय!!!
सरवांच्या मनात एक छोटंस
घर करून राहायचय,
माझ्या नुसत्या आठवणींतुनच
दुःखी मनांना हसवायचय,
एकदा का "fullstop" लागला की,
आठवणींतुनच मला पुन्हा जगायचय!!!!

Friday, May 15, 2009

पाऊस असा रुणझूणता

पाऊस असा रुणझूणता

पैंजणे सखीची स्मरली

पाऊस भिजत जाताना

चाहूल विरत गेलेली ...

ओले त्याने दरवळले

अस्वस्थ फुलांचे घोस

ओलांडून आला गंध ,

निस्तब्ध मनाची वेस

पाऊस असा रुणझूणता

[ पाउस सोहला झाला ,

पाउस सोहला झाला कोसळत्या आठवणीचा

कधी उधाणता अन केव्हा

संथ थेम्बंच्या संथ लयीचा ]..

नभ नको नको म्हणताना पाउस कशाने आला

गात्रातून स्वच्छंदी अन अंतरात घुसमटलेला..

पाऊस असा रुणझूणता पैंजणे सखीची स्मरली

पाऊस भिजत जाताना चाहूल विरत गेलेली..

लागते अनाम ओढ श्वासाना

लागते अनाम ओढ श्वासाना

येत असे उगाच ओठाना

होई का असे तुलाच स्मरताना.....

एकांती वाजतात पैजणे

भासांची हालतात कंकणे

कासावीस आसपास बघताना.....

मी असा जरी निजेस पारखा

रात्रीला टाळतोच सारखा

स्वप्न जागती उगाच निजताना.....

आज काल माझाही नसतो मी

सर्वातुन एकटाच असतो मी

एकटेच दूर दूर फ़िरताना.....

.... " वेडू..."

आठवण कुणाची येते ना...
तेव्हा मन वेडं होत...
पापणीच्या आडून मग...
अलगद ते ओघळू लागतं

तुला ही आठवण येईलच ना...
तेव्हा डोळे येतील भरून,
थरथरणार्या ओठांवर...
शब्द ही जातील विरून
मोत्यासार्ख्या अश्रुंना
ओंजळीत घ्यावं लागत

बघ ना...बोलत बोलता॥
मन होइल तुझं हलकं...
मी ही मग स्वतःला
मुक्यानेच करेन बोलकं...

मग मलाच म्हणशील तू.... " वेडू..."
....तेवढं बरं तुला कळतं
वेडे, .....तुझीच आठवण येते.......
मन, अलगद ओघळू लागतं

कूणीतरी लागते आपल्याला वेडू
म्हणणारेआणि वेडू म्हणतांना
आपल्यातील शहाणपण जपणारे

Total Pageviews