Powered By Blogger

Tuesday, June 1, 2010

संध्याकाळचा पाउस...

संध्याकाळचा पाउस मला गाणे गायला सांगायचा
माझे गाणे ऐकून त्यातले चार शब्द मागायचा
मी शब्द दिल्या वरती पाउस अगदी खुश होई
नखा शिखांत भिजवून मला ओला चिंब करून जाई

संध्याकाळचा पाउस मग रिम झिम रिम झिम बरसायचा
माझे घर भिजवून पुन्हा अंगण भर पसरायचा
इंद्रधनू होऊन पाउस सात रंगात फुलत असे
उन्हात पाउस पावसात उन छप्पा पाणी खेळत असे

पावसात चिंब चिंब भिजून मना मधे मोहोर फुटे
पावसामुळे पावसा सकट संध्याकाळ हवी वाटे
संध्याकाळचा पाउस मला थेंब न थेंब आठवतो
अजुन सुधा माझ्या साठी पाउस गाणे पाठवतो

---Anonymous

No comments:

Total Pageviews