आज मी ठरवलय बिनधास्त राहायच
वाऱ्याच्या उलटया दिशेन धावायच
आज मी ठरवलय नेहमी हसायच
अश्रुंना पापण्यांच्या मधेच दाबायच
आज मी ठरवलय सर्व काही विसरायच
आठवणींच्या सागरात सगलळच बुडवायच
आज मी ठरवलय स्वताला ओळखायच
स्वतःच आस्तीत्व स्वतःला पटवायच
आज मी ठरवलय खूप खूप जगायच
प्रत्येक ऋतुमधे,जीवन जगणं शिकायच
No comments:
Post a Comment