Powered By Blogger

Saturday, March 6, 2010

अजून सुद्धा तू कधीतरी कुठेतरी वाटेत दिसतेस........

तेच ते रोजचे जीवन जगताना
अजून सुद्धा तू कधीतरी कुठेतरी
वाटेत आकस्मिक दिसतेस
हजारो लाखो जणांच्या गर्दीतही
नजर अगदी सहज खेचून घेतेस............

वाटते तेव्हा तसेच येऊन तुज गाठावे
हळूच येऊन पाठीत थोपटावे......
हास्याचे तेव्हा कारंजे फुलावे
दोघांनी मिळून स्वच्छंद हसावे
थोड्या गुजगोष्टी कराव्यात
आणि मनमोकळे मनसोक्त बोलावे..................

पण मन सांगते
दिवस तुझे ते केव्हाच संपले
ते सोनेरी क्षण इतिहास जमा झाले
जे घडले ते तिचे तिला राहिले
आणि तुझे तुलाच राहिले..............

पुढे सरसावणारे हात आवरते घेतात
पाय माझे तेव्हा
जागच्या जागीच थबकतात....................

मनसुबे सारे माझे
तिथेच विरतात आणि डोळ्यातून दोन अश्रू
खळकन झरतात
आनंदाचे की दुःखाचे??????????

No comments:

Total Pageviews