Powered By Blogger

Friday, September 18, 2009

Do I Luv Him OR Not?

Do I Luv Him OR Not?
हाच संभ्रम आहे ना तुझ्या मनात?
मी सांगतो, याच उत्तर...
तुझ्या डोळ्यात वाचले काल, एका क्षणात...

U don't luv me...
आश्चर्य वाटले ऐकून...?
नको अशी रागावूस ग..
मी तुटून गेलोय,हे उमजुन..

नको खेलूस अशी...
तुझ्याच भावनांशी,
एकांतात उलगडेल कोड
आत्म्याच आत्म्याशी

प्रेम म्हणजे कालजी
प्रेम म्हणजे जाणीव
यापैकी माझ्याबद्दल तुला
वाटली फ़क्त उणीव...

मी करतो प्रेम तुझ्यावर
असाच करत राहीन
'कुठवर चालेन हा रास्ता?'
हे उत्तर मात्र टाळत राहीन...

'अंतापर्यंत' या उत्तराला
पर्यायी शब्द नकोय मला
तुला वेदना होतील म्हणुन
आवर घातलाय स्वताला

तू ही कधी विचारू नकोस
"का प्रेम करतो तुझ्यावर?"
माझच मला कळत नाही
'का करतो मी तुझ्यावर...?'

तू कितीही दूर गेलीस तरी
नेहमीच जवळ असतेस
मी एकांतात असताना
उगाच मला छेडतेस...

याचा दोष कधीही
मी तुला देणार नाही
तुझ्या प्रेमच अर्घ्य
जबरदस्ती पदरात घेणार नाही

माझ्या प्रेमाने माझ्यावर
बेधुंद प्रेम कराव...
पण ते प्रेम आधी
तुला स्वताला उमगाव...

नाही करत तू प्रेम माझ्यावर
माझ काहीच म्हणण नाही
मी केल म्हणुन तू ही कर
अशी काही जबरदस्ती नाही

मला सवय आहे
तुझी वाट पाहण्याची
तुझ्या प्रत्येक गोष्टीत
स्वताला झोकून देण्याची

नाही जमणार तुला
प्रेमाच्या वाटेवर चालण
हसता-हसता अचानक
डोळ्यात अश्रु लपवण...

तुझ्या एका शब्दावरून
भावना तुझी जाणतो
कस म्हणू? सांग मला
तुझ्या मनी 'मी'च रांगतो...

खोटा शब्द, खोटे आश्वासन
उगाच देऊ नकोस मला
"नाही करत मी प्रेम तुझ्यावर"
एकदाच फ़क्त सांग मला

शेवटचा का असेना
पण सोसेन हा घाव
जाइन मी दूर असाच
शोधशील का कधी माझा ठाव?

सांग ना...

No comments:

Total Pageviews