आयुष्याच्या एका वळणावर प्रत्येकजण कवी बनतो...
कधी ना कधी एक तरी कविता करतो
कधी प्रेमात तर कधी विरहात...
एकदा तरी भावुक बनतो
जगाला विसरून स्वताच्या विचारात रमतो
आपल्या भावना कागदावर उतरवतो...
नसतात कोणी सखे सोबती
तेव्हा लेखनीला जवळ करतो,शब्दांना आपल म्हणतो
आयुष्यात माणूस एकतरी कविता करतो
प्रत्येक 'स्वप्नवेडा' एकदा तरी 'शब्दवेडा' बनतो
No comments:
Post a Comment