---------------------------------------------------------------------------------------
मला पुन्हा एकदा तरी शाळेत जायचय.
धावत जाऊन माझ्या रोजच्या बाकावर बसायचय
रोज सकाळी खड्या आवाजात राष्ट्रगीत म्हाणायचाय
नव्या वहिचा वास घेत पहिल्या पानावर
छान अक्षरात आपल नाव लिहायचाय
मला पुन्हा एकदा तरी शाळेत जायचय.
मधली सुट्टी होताच वाटरब्याग सोडुन
नलाखाली हात धरून पानी प्यायचाय,
कसाबसा डबा सम्पवत तिखट मीठ लावलेल्या
चिन्चा, बोर, पेरु, काकडी सगळ खायचय
सायकलच्या चाकाचा स्ट्म्प करुन क्रिकेट खेलायचय,
मला पुन्हा एकदा तरी शाळेत जायचय.
उद्या पाऊस पडुन शालेला सुट्टी मिलेल का?
हा विचार करत रात्री झोपी जायचय,
अनपेक्षित मिळणारा सुट्टीच्या आनन्दासाठी,
मला पुन्हा एकदा तरी शाळेत जायचय.
घन्टा व्हायची वाट का असेना
मित्राशी गप्पा मारत वर्गात बसायचाय,
घन्टा होताच मित्राशी सयकलची रेस लावून घरी पोहचायचय,
मला पुन्हा एकदा तरी शाळेत जायचय.
कितीहि जड असुदे... जबाबदारीच्या ओझ्यापेक्षा
दप्तराच ओझ पाठिवर वागवायचय,
कितीहि उकडत असू दे.. वातानुकूलित ऒफ़िसपेक्षा
पन्खे नसलेल्य वर्गात खिड्क्या उघडून बसायचय,
कितीहि तुटका असु दे..
ऒफ़िसमधल्या एकट्या खुर्चिपेक्षा दोघान्च्या बाकावर ३ मित्र बसायचय...
---------------------------------------------------------------------------
माझ्या कट्ट्यावरच्या मित्रांनो
बिडी फ़ुकनार्या फ़ुकट्यनो
खुप दिवस कट्ट्यावर
कुणी फ़िरकलच नाही वाटते.
उधारीच खाते अजून मिटल नाही वाटते...
त्य कट्ट्यावरच्या शिट्ट्यनो
त्या बार मधल्या दिवट्यनो
एक पेग मझ्या नावाचा
राखून ठेवायचा आहे...
माझ्या नावाचा प्रसाद
तुम्हाला बांधून ठेवायचा आहे....
एक दिवस तुमची आठवण
जात नाही खरी...
असं कुढत जगण्यापेक्षा...
कट्ट्यावर कुत्राची मौत बरी...
त्या रस्त्यावरच्या भटक्यांनो
एक दिवस तुमचा सगळ्यांचा
खुप चांगला जाईल.....
ज्या दिवशी तुमचे
कुणाशीतरी लग्न होईल
काही दिवस तुम्हाला आमची
नाही आठवण यायची....
परत आहेच दर शनिवारी
एक QUARTER प्यायची
या कट्ट्यवर मरणर्यांनो...
या कट्ट्यवर मरणर्यांनो...
आयुष्य आपलं असंच
वाढत जाईल वाटतं....
जुन्या दिवसांच सुख
केवळ आठवण होऊन साचतं
तुमच्या सगळ्यांची आज
मला आठवण नाही यायची....
दोन पेग झालेत आता
तिसर्याची वाट पहयची.....
त्या कट्ट्यावर येणार्यांनो
त्या कट्ट्यावर जाणार्यानो
पुन्हा पुन्हा आपण
त्या कट्ट्यवर जमायचं
एका BEER च्या खंब्यात
चौघांनी ऑऊट व्हायचं
GLASS मधला पेग आता
संपून जाईल वाटतं.....
पुन्हा तिथली आठवण
--------------------------------------------------------------------------------------------------------
आयुष्य खूप सुंदर आहे,
सोबत कुणी नसलं तरी,
एकट्यानेच ते फुलवत रहा,
वादळात सगळं वाहून गेल,
म्हणुन रडत बसू नका,
वेगळ अस काही, माझ्यात खास नाही असं म्हणून उदास होऊ नका
मृगाकडे कस्तुरी आहे,
फुलात गंध आहे,
सागराकडे अथांगता आहे,
माझ्याकडे काय आहे, असं म्हणून रडू नका,
अंधाराला जाळणरा एक सूर्य तुमच्यातही लपला आहे.
आव्हाहन करा त्या सूर्याला!!!!! मग उगवेल तो तुमच्या आयुष्यात नवीन क्षितिज घेऊन.
अंधारामय रात्र संपवून सोनेरी किरणांनी सजून
मग रोजच उगवेल एक नवी सकाळ,
उत्साह ध्येयाने भारुन म्हणून .........
आयुष्य खूप सुंदर आहे,
सोबत कुणी नसल तरी
एकट्यानेच ते फुलवत रहा..
--------------------------------------------------------------------------------------
म्हणुन मी हल्ली बोलतच नाही.....
मित्रांची नावे ई-मेल आय.डी. असतात,
भेटायच्या जागा चाट-रूम असतात,
कट्ट्यावर कोणी आता भेटतच नाही,
दिलखुलास शिवी कानी पडतच नाही,
म्हणुन मी हल्ली बोलतच नाही
दिसले कि हाय, जाताना बाय
पण समोर असताना प्रश्नचिन्ह, कि बोलायच काय,
अशी खोटी जवळीक मी कधी साधतच नाही,
मुखवट्याआड चेहरा कधी लपवत नाही
म्हणुन मी हल्ली बोलतच नाही
आज इथे उद्या तिथे......... कोणासाठी कोणी थांबणार नाही
कोणीतरी साथ द्यावी हा माझा अट्टहास पण नाही,
पण इथुन तिथे जाताना कोणी निरोप तरी देइल कि नाही,
जाताना आपण, कोणी एक अश्रु तरी ढाळेल कि नाही,
म्हणुन मी हल्ली बोलतच नाही
शब्दच हल्ली अर्थ विसरतात,
संवेदनाच हल्ली बधीर होतात,
भावनाच हल्ली बोथट होतात,
अगदी थोडी माणसचं हि कविता शेवटपर्यत वाचतात........
----------------------------------------------------------------------------------------
पहिलं वाटलं थोड थांबाव....
नंतर म्हटलं सांगुन टाकावं.....
माझं तुझ्यावर प्रेम आहे...!!!
भिरभिरते डोळे ...
अस्थिर मन....
याला केवळ एकच कारण.....
माझं तुझ्यावर प्रेम आहे...!!!
दिवस-रात्र एकच धुन....
घुमत असते प्राणा-प्राणांतुन....
माझं तुझ्यावर प्रेम आहे...!!!
पटलं तर स्विकार....
नाहितर नकार...
तरिसुद्धा....
तरिसुद्धा....
माझं तुझ्यावर प्रेम आहे...!!!
माझं तुझ्यावर प्रेम आहे...!!
-----------------------------------------------------------------------------------------
धपकन प्रेमात पडतांना, तिला प्रेमात पाडायचं राहून गेलं,
तोंड दुखेपर्यंत बडबडतांना, हवं ते सांगायचं राहून गेलं.
ती हो म्हणेल की नाही म्हणेल की देईल ठेवून एक मुस्काटात,
हा अशुभ विचार करता-करता हवं ते घडायचं राहून गेलं.
नुसताच बघत बसे मी तिच्या काळ्याभोर डोळ्यांमध्ये
तिच्या डोळ्यात स्वतःला शोधतांना माझ्याविना तिचं अडायचं राहून गेलं.
तिच्या ओढणीचा, खांद्याचा स्पर्श हवा-हवासा वाटतसे नेहमी,
सांगीन तिला कधीतरी म्हणतांना हा विषय काढायचं राहून गेलं.
प्रत्येक भेटीनंतर ती जातांना घालमेल जीवाची असह्य होई,
त्या दिवशीही ती निघाली अन तिला अडवायचं राहून गेलं
---------------------------------------------------------------------------------------------
आयुष्याच्या अल्बममध्ये
आठवणींचे फ़ोटो असतात
आणखी एक कॉपी काढायला
निगेटिव्ह्ज मात्र शिल्लक नसतात
गजर तर रोजचाच
आळसाने झोपले पाहिजे,
गोडसर चहाचा घोट घेत
Tom n Jerry पाहिल पाहिजे.
आन्घोळ फ़क्त 10 मिनीटे?
एखाद्या दिवशी 1 तास द्या,
आरश्यासमोर स्वतःला
सुन्दर म्हणता आल पाहिजे.
भसाडा का असेना
आपाल्याच सुरात रमल पाहिजे,
वेडेवाकडे अन्ग हलवत
नाचणसुध्धा जमल पाहिजे.
गीतेच रस्ता योग्यच आहे
पण एखादा दिवस पाडगावकराना द्या,
रामायण मालिका नैतिक थोर
BayWatch सुध्धा enjoy करता आली पाहिजे.
कधीतरी एकटे
उगाचच फ़िरले पाहिजे,
तलावाच्या काठावर
उताणे पडले पाहिजे.
सन्ध्याकाळी मन्दिराबरोबरच
बागेत फ़िरल पाहिजे
'फ़ुलपाखरान्च्या' सौन्दर्याला
कधीतरी भुलल पाहिजे.
द्यायला कोनी नसल
म्हणुन काय झाल?
एक गजरा विकत घ्या
ओन्जळभरुन फ़ुलान्चा नुसता श्वास घ्या.
रात्री झोपताना मात्र
दोन मिनीटे देवाला द्या,
एवढ्या सुन्दर जगण्यासाठी
Thanks नुसत म्हणा !!!!!
No comments:
Post a Comment