Powered By Blogger

Wednesday, January 14, 2009

Some more Marathi Poems...Not Mine...


तिला मी शोधतो आहे...............
तिला मी शोधतो आहे

जिच्या॒खळीवर चंद्राचे चांदणे उमलेल तिला मी शोधतो आहे।
बाईकवर बिलगून बसेल, मित्रांसमोर मी मिरवेन तिला मी शोधतो आहे।

माझ्या विनोदाला हसेल, वा काय विनोद! म्हणेल तिला मी शोधतो आहे.
आज मॅच आहे म्हणताच, भेटलो नाही तरी चालेल म्हणणारीला शोधतो आहे.

सारख सारख लाडात येऊन शॉपिंगला चल म्हणणार नाही, तिला मी शोधतो आहे।
माझ्या डोळ्यातल्या स्वप्नांना, ही माझीच तर स्वप्ने म्हणेल तिला मी शोधतो आहे.

मला आवडणारी असेलच पण आईला सुध्दा आवडेल तिला मी शोधतो आहे।

माझ्या गालांवरचे अश्रू आपल्या ओठांनी टिपून घेईल तिला मी शोधतो आहे.
घामाघूम झाल्यावरही हळूच मिठीत विसावेल तिला मी शोधतो आहे।

न बोलताही सारे मनातले जाणून घेईल तिला मी शोधतो आहे।
माझी सारी सुख-दुःखे आपलीच म्हणून वाटून घेईल तिला मी शोधतो आहे........

---------------------------------------------------------------------

कुणाच्या इतक्याही जवळ जावू नये
की आपल्याला त्याची सवय व्हावी
तडकलेच जर ह्र्दय कधी
जोडतांना असह्य यातना व्हावी

डायरीत कुणाचे नाव इतकेही येवू नये
की पानांना ते नाव जड व्हावे
एक दिवस अचानक त्या नावाचे
डायरीत येणे बंद व्हावे

स्वप्नात कुणाला असंही बघु नये
की आधाराला त्याचे हात असावे
तुटलेच जर स्वप्न अचानक
हातात आपल्या कहीच नसावे

कुणाला इतकाही वेळ देवू नये
की आपल्या क्षणाक्षणावर त्याचा अधिकार व्हावा
एक दिवस आरशासमोर आपणास
आपलाच चेहरा परका व्हावा

कुणाची इतकीही ओढ नसावी
की पदोपदी आपण त्याचीच वाट बघावी
त्याची वाट बघता बघता
आपलीच वाट दिशाहीन व्हावी

कुणाची इतकेही ऐकू नये
की कानात त्याच्याच शब्दांचा घुमजाव व्हावा
आपल्या ओठातूनही मग
त्याच्याच शब्दांचा उच्चार व्हावा

कुणाची अशीही सोबत असू नये
की प्रत्येक स्पंदनात ती जाणवावी
ती साथ गमवण्याच्या केवळ भीतीने

डोळ्यात खळकन अक्ष्रू जमावी

कुणाला इतकाही माझा म्हणू नये
की त्याचे ' मी पण ' आपण विसरुन जावे
त्या संभ्रमातून त्याने आपल्याला
ठेच देवून जागे करावे
पण, पण
कुणाच्या इतक्याही दूर जावू नये
की आपल्या सावली शिवाय सोबत काहीच नसावे॥

-------------------------------------------------------------------

कँटीन मधला चहा आणि
चहा सोबत वडा पाव
पैसे कुठ्ले खिशात तेव्हा
उधारीचचं खातं राव !

कट्ट्यावर बसणं लेक्चर चुकवून
आणि पोरींची चेष्टा करणं
दिसलीच एखादी चांगली तर
तिला लांबूनच बघून झुरणं !

बसलोच चुकून लेक्चरला तर
शेवटचा बाक ठरलेला
कुणाच्या तरी वहीतलं पानं
आणि पेन सुध्दा चोरलेला !

परिक्षा जवळ आली
कि मात्र रात्री जागायच्या
डोळ्यात स्वप्नं उद्याची
म्हणून झोपाही शहाण्यासारख्या वागायच्या !

पूर्ण व्हायचं एक वर्तुळ
एक वर्ष सरायचं
पुन्हा नव्या पाखरांसोबत
जुनं झाड भरायचं.

अशी वर्तुळ भरता भरता कळलं
अरे कागदच भरला !
वर्तुळ झाल्या कागदाला
फ़क्त सलाम करायचा उरला !!

पुन्हा नविन रस्ता
पुन्हा नविन साथी
जुन्या रस्त्याच्या , प्रवासाच्या
फ़क्त आठवणीच हाती !!!!!!


----------------------------------------------------------------

मी चालत आसताना पाय अचानक थांबतात
कुठुन तरि ओळखीचे शब्द काणी पडतात
ह्र्दयाचे ठोके ही हळुहळु वाढतात
मन आणी ङोळे दोघं ही मागं वळुन पहातात
त्या आशेच्या नजरेने मागं वळुन पहाताना
मला तुझी आणी फ़क्त तुझीच आठवण येते

त्या दीवशी मी जरा जास्तच घाईत होतो
गदी असताना ही ट्रेन मध्ये शीरलो होतो
अचानक कुणीतरी ओळखीचं वाटलं
तोच तो चेहरा पाहील्या सारखं भासलं
उशीर झाला तरी चुकीच्या स्टेशनवर उतरताना
मला तुझी आणी फ़क्त तुझीच आठवण येते

नको असतानाही मीत्र फ़ीरायला घेवुन जातो
एकांत हवा असतो पण मैत्री पुढे ईलाज नसतो
वीसरता यावं तुला म्हणुन मी हि त्या गदीत शीरतो
शोधतो त्या मानसांत एखादा ओळ्खीचा चेहरा
त्या लाखोंच्या गदीत ही मी एकटाच फ़ीरताना
मला तुझी आणी फ़क्त तुझीच आठवण येते

दीवसा उजेडात स्वतःला सावरताना
सायंकाळी सुर्य अस्ताला जाताना
रोज रात्री जागरन करताना
पांघरुन घेवुन अश्रु ढाळताना
जेव्हा मी स्वतःलाच जळताना पाहतो
तेव्हा ही मला तुझी आणी फ़क्त तुझीच आठवण येते.


---------------------------------------------

असं का होत? कुणीतरी खुप आवडायला लागतं....
अनं ते आवडण, एकाकी मनाला वेड लाऊ लागतं......

असं का होत? कुणाचीतरी खुप आठवण यायला लागतें...
अनं ते आठवणच, आयुष्याचा प्रत्येक क्षण व्यापु लागतें....

असं का होत? कुणीतरी ह्र्दयाच्या खुप जवळ येतं........
अनं ते जवळ येण,आपल्यालाच आपल्यापासुन खुप दुर घेऊन जाते......

असं का होत? कुणीतरी आधारासाठी हात देऊ लागतो.......
अनं तो आधाराचा हातच जगण्याचा आधार होऊन जातो.......

असं का होत? कुणीतरी क्षणभर आनंद देऊन जातो.....
अनं तो आनंदच सगळ्या दुःखानंच मुळ होऊन जातो....

असं का होत? कुणासाठीतरी जगावास वाटतं......
अनं जगावास वाटतानाच, मरणाला कवटाळाव लागत..........

-------------------------------------

तो द्विधा मनस्थितीत आहे, रात्रभर तीचे स्वप्न पाहून सकाळी उठलेल्या 
त्याचे मनातील विचार जाणण्याचा हा प्रयत्न

"का येऊन माझ्यापुढे
पुन्हा सर्व सांडून गेलीस
साठवुन साठवुन लपवलेले
पुन्हा समोर मांडून गेलीस

रंगवलेली स्वप्न मनात
कशीतरी कोंबली होती
का येऊन माझ्यापुढे
सारी दारं उघडुन गेलीस

"तुझ्याकडचे सारे शब्द
तेव्हा मी सोसले होते
मी जेव्हा बोलणार तेव्हा
समोर काहीच उरले नव्हते"

पाऊस आजही आला आहे
पाणी तसेच भरले आहे
तेव्हा कधी तू होतीस
आता माझा मीच आहे

पण,
आज तू पुन्हा मला
होती तशीच आठवून गेलीस
माझ्याच रागामध्ये मला
पुन्हा मला झुरवुन गेलीस

सारे काही अजून माझ्या
आठवणीत तसेच आहे
तूझे ते गोड हसणे
साठवणीत तसेच आहे

गालावरच्या खळीमध्ये
मीच घसरून पडलो होतो
चोरून मला तू पाहतांना
माझा मीच फसलो होतो

दारामध्ये आज मात्र
मी एकटाच उभा आहे
शब्दांच्या पुराचे पाणी
बाहेर काढून टाकत आहे

काही झाले तरी शेवटी
माझा मी तसाच आहे
शब्द, भावना आणि तु
यामध्येच झुलतो आहे

अजूनही मनात एक
आशा मात्र टिकून आहे
वाटेत कधी दिसशील म्हणून
दारात मी उभा आहे
दारात मी उभा आहे"

2 comments:

Unknown said...

Both poems are excellent , also very nice blog.

Anonymous said...

Chhan ahet re kavita....
tula kase kay suchte ki....
m njoyin

Total Pageviews