बरंच काही बदलण्यासाठी
एका उमलेल्या कळीला फुलात बदलण्यासाठी
किंवा त्याच फुलाला कोमाजाव्ण्यासाठी
फक्त एक क्षण पुरेसा असतो
एक जन्मभराची मैत्री मिळण्यासाठी
किंवा एका मित्राला कायमचा निरोप देण्यासाठी
फक्त एक क्षण पुरेसा असतो
मित्रांसोबत एक Random joke आठवण्यासाठी
आणि मग त्या joke वर तासंतास हसण्यासाठी
फक्त एक क्षण पुरेसा असतो
परीक्षेचा निकाल समजण्यासाठी
कुठे Firstclass मिळाल्याचा आनंद उसळण्यासाठी
तर कुठे KT चे डोंगर कोसळण्यासाठी
फक्त एक क्षण पुरेसा असतो
एका सुंदर मुलीवर crush होण्यासाठी
किंवा propose केल्यावर तिचा नकार ऐकण्यासाठी
फक्त एक क्षण पुरेसा असतो
हृदयाच्या कोपर्यात प्रेमाचा पाझर फुटण्यासाठी
किंवा न मिळालेल्या प्रेमाची आठवण करून देण्यासाठी
एक एक क्षणात बरंच काही दडलंय
तरीही long term plan करण्याचं वेड लागलंय
बरेचसे plan एका क्षणात मोडून जातात
ठरवलेलं काही औरच पण भलतंच घडवून जातात
न मिळालेल्या गोष्टींसाठी कायमचं रडायचं असतं
का समजत नाही आपल्याला आयुष्य प्रत्येक क्षणात जगायचं असतं
---Anonymous